Exclusive : सैफ अली खानच्या 'तांडव'मध्ये सुनील ग्रोवर आणि जिशान आयुबची वर्णी

By  
on  

पिपींगमूनने तुम्हाला यापूर्वीच म्हणजे 5 ऑगस्ट रोजी सांगितलं होतं की, अली अब्बास जफरच्या आगामी वेब सिरीज 'तांडव'मध्ये सैफ अली खान भूमिका साकरतोय. 'तांडव' ही एक बिग बजेट वेबसिरीज आहे. ह्यात 12 प्रमुख व्यक्तिरेखा असणार आहेत. ज्यात दोन नायकांचा समावेश असणार आहे. तसंच ही एक आठ एपिसोडची वेबसिरीज असेल. अभिनेत्री क्रृतिका कामरासुध्दा यात प्रमुख भूमिकेत आहे. क्रृतिकाने जॅकी भगनानीसह 'मित्रों'मधून बॉलिवुड डेब्यू केला आहे. 

आता पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार 'तांडव' या वेब शोमध्ये अभिनेता सुनील ग्रोवर आणि जिशान आयुबसुध्दा झळकणार आहेत. सुनील ग्रोवर अली अब्बास जफरच्या 'भारत' सिनेमात झळकला होता तर जिशान आयुबने 'मिशन मंगल'मध्ये नुकतीच भूमिका साकारली होती. 

पूरब कोहली, सराह जेन डीएस, शोनाली नागरानी आणि कुणाल मिश्रा हे या सीरीजचे लेटेस्ट एडिशन आहेत. सूत्रांनुसार, डिम्पल कपाड़िया आणि गौहर खान यांच्यासुध्दा 'तांडव'मध्ये महत्वपूर्ण भूमिका आहेत, परंतु अद्याप त्यांच्या कास्टिंगबाबत कोणतंही शिक्कामोर्तब झालेलं नाही. 

Recommended

Loading...
Share