#Exclusive: सुजॉय घोषच्या क्राईम थ्रिलरमध्ये विक्रांत मेस्सी आणि सोनम कपूर एकत्र

By  
on  

अभिनेता विक्रांत मेस्सीचे तारे सध्या सातव्या आसमानवर आहेत. 2019 मध्ये 'मेड इन हेवन', 'क्रिमिनल जस्टिस' और 'ब्रोकन बट ब्यूटीफुल सीजन 2' या वेबसिरीजमध्ये झळकल्यानंतर त्याची वर्णी दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’मध्ये लागली. यात तो दीपिकाच्या नव-याची भूमिका साकारत आहे. विक्रांतच्या हातात याशिवाय आणखीही सिनेमे आहेत. यानंतर रॉनी स्क्रुवालाच्या ‘यार जिगरी’मध्ये सनी सिंहसोबत दिसणार आहे. याशिवाय  'गिन्नी वेड्स सनी' मध्ये यामी गौतमसोबत दिसणार आहे.

 

 

विक्रांतने गर्लफ्रेंड शितल ठाकूरसोबत दिसणार आहे. याशिवाय पीपिंगमूनला नुकतंच समजलं आहे की, विक्रांत सोनम कपूरसोबत सुजॉय घोषच्या क्राईम थ्रिलरमध्ये दिसणार आहे. सोनम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा साऊथ कोरियन ‘ब्लाईंड’ सिनेमाचा रिमेक आहे. यात सोनम एका अंध पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका गुन्हेगाराचा पाठलाग करताना अंधत्व आलेली सोनम एक केस सोडवण्यास मदत करते अशी या सिनेमाची कथा आहे. हा सिनेमा मार्च2020ला फ्लोअरवर जाईल.

Recommended

Loading...
Share