Exclusive: 19 वर्षांनंतर राकेश ओमप्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन करणार एकत्र काम

By  
on  

2001 मध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन यांनी अक्स सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं. आता ते तब्बल 19 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 2020 मध्ये सुरु होत असलेल्या प्रोजेक्टसाठी हे दोघे एकत्र काम करतील. राकेश यांनी यापुर्वीही अमिताभ यांना साईन करण्याचा प्रयत्न केला होता पण तांत्रिक बाबीमुळे हे दोघेही एकत्र येऊ शकले नव्हते. 

 

राकेश मेहरा सध्या त्यांच्या ‘तुफान’ या सिनेमात व्यस्त आहेत. या सिनेमात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा बॉक्सरच्या आयुष्यावर बेतला आहे. मेहरा यांनी बिग बींना तीन स्क्रीप्ट दिल्या आहेत.  'द लॉस्ट सिटी ऑफ़ द्वारका' चा रीमेक, एक हलकी फुलकी कॉमेडी आणि एका 50 वर्षांच्या व्यक्तीच्या जीवनाची गोष्ट. आता बिग बींनी कोणती स्क्रीप्ट निवडली आहे. हे समजू शकलेलं नाही. पण 2020च्या हाफमध्ये या सिनेमावर काम करण्यास सुरुवात होईल असं पीपिंगमूनला समजलं आहे.

Recommended

Loading...
Share