Exclusive: ‘छपाक’ चं क्रेडिट लक्ष्मीच्या वकिल अपर्णा भट्ट यांना देण्याचा कोर्टाचा आदेश

By  
on  

दीपिका स्टारर ‘छपाक’च्या मागे वाद-विवादांचं ग्रहण लागलेलं दिसत आहे. मेकर्सच्या विरोधात लक्ष्मीच्या वकील अपर्णा भट यांनी एक याचिका दाखल केली होती. यात मेकर्सनी त्यांना क्रेडिट न दिल्याचा मुद्दा होता. अपर्णा यांनी ही बाब सोशल मिडियावर देखील शेअर केली होती. 
दिल्ली कोर्टाने यावर नुकताच निर्णय दिला आहे. कोर्टाने मेकर्सना अपर्णा यांना सिनेमामध्ये क्रेडिट देण्याचा आदेश दिला आहे.

 

 

कोर्ट म्हणतं, ‘अपर्णा महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात कायमच लढत आल्या आहेत.’ ही ओळ देखील क्रेडिट फुटेजमध्ये समाविष्ट करण्यात यावी. यापुर्वी छपाकला लेखक राकेश भारती यांनी केलेल्या कॉपीराईट आरोपांनाही सामोरं जावं लागलं होतं. ‘छपाक’10  जानेवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share