Exclusive: इम्रान हाश्मी बनणार ‘हरामी’, का ते जाणून घ्या

By  
on  

इम्रान हाश्मी सध्या कामात भलताच व्यस्त आहे. घसरलेल्या करीअरला पुन्हा रुळावर आणण्यासाठी इम्रान प्रयत्नशील दिसत आहे. येत्यावर्षात त्याचे अनेक सिनेमे रिलीज व्हायच्या मार्गावर आहेत. यावर्षी तो रुमी जाफरीच्या ‘चेहरे’ या सिनेमात दिसणार आहे. यात तो एका बिझेनेस टायकूनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. 

याशिवाय तो संजय गुप्ता यांच्या ‘मुंबई सागा’ सिनेमातूनही रसिकांच्या समोर येत आहे. यात तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय 2017मधील मल्याळम हॉररा कॉमेडीच्या रिमेकमध्येही त्याची वर्णी लागणार आहे. इम्रानचा चौथा सिनेमा देखील थ्रिलरच आहे. त्याच्या या सिनेमाचं नाव आहे ‘हरामी: द बास्टर्ड’. खरं तर या सिनेमाच्या पुर्वी इम्रानच्या विजय गुत्तेंच्या ‘वायुसेना’ या बायोपिकचं शुटिंग सुरु होणार होतं. पण काही कारणास्तव ते सुरु न झाल्याने इम्रानने हरामीच्या शुटिंगला सुरुवात केली आहे.

Recommended

Loading...
Share