Exclusive: प्रभास झळकणार पुजा हेगडेसोबत, दिसणार ज्योतिषाच्या भूमिकेत

By  
on  

‘साहो’नंतर प्रभास पुन्हा कधी मोठ्या पडद्यावर झळकणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. तो के. के. राधाकृष्ण यांच्या रेट्रो लव्ह स्टोरीमध्ये दिसणार आहे. यात तो पुजा हेगडेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 
गोपी कृष्णा मुव्हीज आणि युवी क्रिएशन्स एकत्रित या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

या सिनेमाच्या दोन शेड्युलचं शुटिंग आतापर्यंत पार पडलं आहे. सेटवर खुपच कडक सिक्युरिटी असल्याने सिनेमाच्या कथानकाबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा सिनेमा तीन भाषांमध्ये बनणार आहे. प्रभास यात हस्तरेखा तज्ज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपपेक्षा ही वेगळी असणार आहे. पुजा या सिनेमात डॉक्टरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. रेट्रो फिल देणारा हा एक संवेदनशील सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. 

या सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री प्रभासच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबत कुणाल रॉय कपूरदेखील या सिनेमात आहे. हैद्राबादमधील वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचं शुटिंग होणार आहे तर पुढील महिन्यात ही टीम ऑस्ट्रियामध्ये शूटसाठी जाणार आहे.

Recommended

Loading...
Share