Exclusive: अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’मधून नुपूर सेनॉन नाही करणार डेब्यु

By  
on  

अक्षय कुमारचा आगामी ‘बेलबॉटम’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून त्याची नायिका कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. अक्षयसोबत या सिनेमात नुपूर सॅनॉन झळकणार अशी चर्चाही होती. पण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार नुपूर या सिनेमाचा भाग नसणार आहे. याशिवाय अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील या सिनेमाचा भाग होणार असल्याची चर्चा आहे.

 

 

पण मृणाल या सिनेमात दिसणार असल्याचीही अफवा आहे. ‘बेल बॉटम’ च्या अभिनेत्रीचं नाव अजून फायनल झालेलं नाही. अक्षय सध्या त्याच्या मार्चमध्ये रिलीज होत सुर्यवंशीची तयारी करत आहे. त्यानंतर तो ‘लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज’ आणि बच्चन पांडे या सिनेमांच्या तयारीमध्ये व्यस्त असणार आहे. त्यानंतर तो बेलबॉटमकडे वळणार आहे. ‘बेल बॉटम’ ची कथा ओरिजिनल स्क्रिप्टवर बेतली असणार आहे.

Recommended

Loading...
Share