Exclusive: यासाठी ‘जवानी जानेमन’ फेम अलायाने बदललं आपलं मूळ नाव

By  
on  

‘जवानी जानेमन’ मधून पुजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाने डेब्यु केला आहे. अलायाच्या अभिनय कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण अलायाचं मुळ नाव आलिया आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पीपिंगमूनला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये अलायाने ही बाब चाहत्यांशी शेअर केली. अलायाच्या मते, बॉलिवूडमध्ये आधीच एक आलिया आहे. ती प्रस्थापित अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या नावाशी तुलना होणं सहाजिक होतं.

 

ही तुलना टाळण्यासाठी आलियाने तिचं नाव बदलून अलाया केलं. याकामी तिला करण जोहरने मदत केल्याचंही सांगितलं. जवानी जानेमनमध्ये अलाया तब्बू आणि सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share