Exclusive: मिस्टर इंडिया 2.0 साठी शाहरुख खान आणि रणवीरने दिली टेस्ट लूक

By  
on  

‘झिरो’नंतर शाहरुखचे फॅन्स त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. पण अजूनही शाहरुखच्या टीमकडून कोणतीही घोषणा केली नाही. पण शाहरुख अली अब्बास जफरच्या मिस्टर इंडिया 2.0 मध्ये दिसणार आहे अशी चर्चा आहे. यासोबतच अरुण वर्माच्या म्हणजे अनिल कपूर यांनी साकारलेली भूमिका रणवीर कपूरच्या वाट्याला गेली आहे.

 

 
झी स्टुडियोने मिस्टर इंडिया बनण्याची बातमी कन्फर्म केली आहे. अनेक मिडिया हाऊसेसनी सांगितलं होतं की शाहरुख हा सिनेमात दिसणार नाही. पण पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अलीने सिनेमाचा प्रोमो शूट केला आहे. मुंबईतील एका स्टुडियोमध्ये ही भेट झाली. 
काही दिवसांपुर्वी अली अब्बास जफरने ट्वीटरवर लिहिलं होतं की  झी स्टुडियोजसोबत मि. इंडियासोबत काम करण्यास उत्साहीत आहे. ही एक आयकॉनिक व्यक्तिरेखा आहे. जी प्रत्येकाला आवडते. तिला पुढे नेणं मोठी जबाबदारी आहे. मी सध्या स्क्रिप्टवर काम करत आहे. अजून कोणताही कलाकार यासाठी फायनल झालेला नाही. स्क्रिप्टचा ड्राफ्ट तयार झाल्यावर ड्राफ्टींग करण्यात येईल.

Recommended

Loading...
Share