Exclusive: रणदीप हुडा आगामी ‘अनफेअर अ‍ॅण्ड लव्हली’ मध्ये करणार इलियाना डिक्रुजसोबत रोमान्स

By  
on  

रणदीप हुडा अलीकडेच ‘लव्ह आज कल’मध्ये दिसला होता. आता त्याने  पुढील सिनेमाची तयारी सुरु केली आहे. तो आगामी मिस्ट्री थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. अनफेअर अ‍ॅण्ड लव्हली’ असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार टॅबू असलेल्या विषयावर बनत असलेल्या या सिनेमात इलियाना डिक्रुजही दिसत आहे. ही भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार आहे.

 

इलियानाच्या आधी झोया हुसैन ही भूमिका करणार होती. पण डेटमुळी तिने नकार दिला. खरं तर शुटिंग ऑक्टोबरमध्ये सुरु होणार होतं. पण तारखामुळे ते आता सुरु होत आहे. याशिवाय गितीका विद्यादेखील दिसणार आहे. बलविंदर सिंह जनुजा या सिनेमातून दिग्दर्शकीय डेब्यु करत आहे. त्यांनी यापुर्वी 'मुबारकां', 'फिरंगी' आणि 'सांड की आंख' या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

Recommended

Loading...
Share