Exclusive: 'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉंचला अक्षय-कतरिनासह 'सिंघम' आणि 'सिंबा'च्या जोडीची खास उपस्थिती

By  
on  

अॅक्शनपटांचा राजा 'सूर्यवंशी'ची सिनेरसिकांना बरीच उत्सुकता आहे. येत्या 2 मार्चला या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला येतोय. या सर्वात मोठ्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यासोबत अजय देवगण व रणवीर सिंहपण उपस्थित असतील. 

पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, निमंत्रण मिळाल्यानंतर अजय देवगण आणि रणवीर सिंह हे दोघं या ट्रेलर लॉंचला करण जोहर, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रोहित शेट्टी यांच्यासह ट्रेलर लॉंचला येण्यास लगेचच तयार झाले. 'सूर्यवंशी'चा ट्रेलर हा ऑनलाईनच रसिकांच्या भेटीला येईल, अशा यापूर्वी चर्चा होत्या, पण त्या तथ्यहीन ठरल्या. आता तर 'सूर्यवंशी'हा 24/ 7पाहता येऊ शकणारा पहिला बॉलिवूड सिनेमा ठरतोय.  महाराष्ट्रात आता मॉल्स आणि थिएटर्स रात्री पण सुरु राहतील, अशा निर्णयानंतर प्रदर्शित होणारा हा पहिला सिनेमा आहे. रोहित शेट्टीने म्हणूनच 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट प्रिपोन करुन 24 मार्चच्या संध्याकाळी सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 

Recommended

Loading...
Share