Exclusive: राजकुमार संतोषी आणि सनी देओलचा ऐतिहासिक सिनेमा ‘फतेहसिंग’ थंड बस्त्यात

By  
on  

दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल शीख योद्धा ‘फतेह सिंग’ हा ऐतिहासिक सिनेमा बनवणार होते. पण आता हा सिनेमा बनणार नाही. सनीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘ कामात अवघडलेपणा असेल तर सनी याकडे दुर्लक्ष करू शकतो. या सिनेमासोबत निर्माते आणि काही आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे हा सिनेमा आता बनणार नाही. 

मागील वर्षी सनी त्याच्या सिनेमापेक्षा मुलाच्या सिनेमावर अधिक लक्ष केंद्रित करत होता. संतोषींनाही याबाबत आयडिया होती. संतोषी 2013पासून हा सिनेमा बनवणार होते. सनीलाही पटकथा आवडली होती.  सनी देओल आणि राजकुमार संतोषी च्या जोडीने दामिनी, घायल आणि घातक यांसारखे सिनेमे एकत्र केले आहेत. यानंतर काही काळ त्यांच्यात दुरावा आला होता. पण त्यानंतर त्यांची पुन्हा मैत्री झाली होती.

Recommended

Loading...
Share