Exclusive: 'राजवाडे अॅण्ड सन्सवर' आधारित येतेय 'शेखावाटी', निखिल अडवाणीच्या या वेब शोमध्ये झळकणार लारा दत्ता व क्रितीका कामरा

By  
on  

फिल्ममेकर निखील अडवाणीने आणखी एका नव्या वेब प्रोजेक्टवर काम सुरु केलं आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, तो लवकरच एक महिला केंद्रित एका खास वेब सिरीजची निर्मित आपल्या एम्मे एन्टरटेन्मेट अंतर्गत करणार आहे. 

गौरव चावला हे या महिला केंद्रित वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सैफ अली खान आणि राधिका आपटे  स्टारर 'बाजार'मधून त्याने आपलं दिग्दर्शकीय पदार्पण केलं होतं. 

शेखावाटी या वेबसिरीजची कथा ही 2004 साली प्रदर्शित झालेला  सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अॅँण्ड सन्स या मराठी सिनेमावर आधारित आहे. यात ज्याप्रमाणे चार चुलतभावंडांमध्ये जसं सिनेमाचं कथानक घडतं. जुन्या आणि नव्या पिढीचा मेळ व त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण पाहायला मिळालीय. तसंच या हॉटस्टार स्पेशल वेबसिरीजमध्येही पाहता येईल. तसंच सूत्रांनुसार लारा दत्ता आणि क्रितीका कामरा या अभिनेत्रींसोबत आणखी दोन अभिनेत्री निखल अडवाणीच्या या वेबसिरीजमध्ये झळकतील. 

मराठी सिनेमावर आधारित 'शेखावाटी' ही हॉटस्टारची वेबसिरीज पाहण्यासाठी आता सारेच उत्सुक आहेत. 

Recommended

Loading...
Share