Exclusive: दीपिका पदुकोण, ऋषी कपूर स्टारर ‘द इंटर्न’ च्या रिमेकच्या दिग्दर्शनाची धुरा कुणाच्या हातात?

By  
on  

या जानेवारी महिन्याच्या शेवटी दीपिका पदुकोणने सुनील खेत्रपालच्या अझुरे एंटरटेनमेंट आणि हॉलिवूडच्या वॉर्नर ब्रदर्ससोबत नॅन्सी मेयरच्या ‘द इंटर्न’ च्या हिंदी रिमेकची घोषणा केली होती. दीपिका आणि ऋषी कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत. पण या सिनेमाची घोषणा करताना दिग्दर्शकाचं नाव मात्र जाहीर केलं नव्हतं. 

 

 

या घोषणेनंतर जवळपास 2 महिन्यांनीही या सिनेमाच्या दिग्दर्शकाचं नावं समोर आलेलं नाहीये. यादरम्यान पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार निर्माते दोन दिग्दर्शकांशी या सिनेमाबाबत चर्चा करत आहेत. पण अजून नाव नक्की झालेलं नाही. सुत्रांच्या माहितीनुसार निर्माते, ‘बधाई हो’ फेम दिग्दर्शक अमित शर्मा आणि ‘इंग्लिश विंग्लीश’ फेम गौरी शिंदे यांच्याशी या सिनेमाच्या दिग्दर्शनाबाबत चर्चा सुरु आहे.

पण अजूनही कुणाला फायनल केलेलं नाही. शर्मा सध्या अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहेत. तर गौरीने इंग्लीश विंग्लीशनंतर कोणताही प्रोजेक्ट केलेला नाही. निर्माते शर्मा आणि शिंदे यांच्या नावाबाबत संभ्रमात आहेत.    द इंटर्न हा एक इंटिमेट रिलेशनशीप ड्रामा आहे. या सिनेमाची गोष्ट 70 वर्षांच्या एका इसमाभोवती फिरताना दिसते. ही व्यक्ती ऑनलाईन फॅशन साईट सिनिअर इंटर्न म्हणून जॉईन करतो. पुढील वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होईल.

Recommended

Loading...
Share