By  
on  

करिना कपूर खान निवडणुकीच्या रिंगणात....बातमी ऐकून बेबो खळखळून हसली!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर खान निवडणूकीच्या रिंगणात  उतरणार अशी चर्चा कालपासून आज दिवसभर सुरु होती. हे ऐकताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत होता. करिना कपूरसारखी ग्लॅमरस अभिनेत्री असा निर्णय कशी घेऊ शकते ही एकच चर्चा रंगली आणि ऐकावे ते नवलच! असेच सर्वांना वाटलं. ही आत्तापर्यंतची सर्वात खळबळजनक आणि धमाकेदार अफवा ठरली.

करिना कपूर खान भोपाळ येथून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहे. करिनाचा पती अभिनेता सैफ अली खान हा भोपाळचा  असल्याने तिला हे तिकीट देण्यात येत आहे. गेले 40 वर्ष कॉंग्रेसला भोपाळ येथील या लोकसभेच्या जागेवर पराभव स्विकारावा लागतो आहे. म्हणूनच करिना कपूर खान भोपाळची ही निवडणूक जिंकू शकते, असा कॉंग्रेसला विश्वास वाटतो, अशा अफवा रंगल्या.

भोपाळ करिनाचे सासर आहे. करिनाच्या जवळच्या सूत्रांनी पिपींगमूनला सांगितल्यानुसार ही बातमी ऐकताच बेबो खळखळून हसू लागली. हसण्यापलिकडे तिला बोलायला काहीच सुचत नव्हतं. तिच्या मते या बातमीत काहीच तथ्य नाही. बेबो सध्या करण जोहरचे आगामी सिनेमे  सिनेमे ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’मध्ये प्रचंड व्यस्त आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive