Exclusive: ‘ब्लाईंड गेम’ मधून सनी देओलचं कमबॅक, साकारणार ही भूमिका

By  
on  

खासदार झाल्यानंतर सनी देओल पहिल्यांदाच सिनेमात कमबॅक करताना दिसणार आहेत. यासाठी त्यांनी अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा नुकताच साईन केला आहे. या सिनेमाची घोषणा करताना सनी म्हणतो, ‘ हा कोणत्याही साऊथ सिनेमाचा रिमेक नाही. हा एक इंटरेस्टिंग विषय आहे. यामध्ये खुप अ‍ॅक्शन आणि सस्पेंस पाहायला मिळेल. 

 

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, अनुज शर्मा या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमात सैन्यातील सनी अंध अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची कथा अशा अधिका-यावर बेतली आहे जो अंध असूनही चार युवकांना वाईटाविरोधात लढण्याचं ट्रेनिंग देतो. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची कमान हनु राघवपुदी सांभाळणार आहेत. त्यांनी आतापर्यंत 'अंदाला राक्षसी', 'लाय' आणि शॉर्ट फिल्म 'आय एम फेमस'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं शुटिंग 5 एप्रिलला होणार होतं. पण करोनाच्या प्रादुर्भावामुळे या सिनेमाचं शुटिंग मे पर्यंत गेलं आहे. 

एका अंध सैनिकाच्या भूमिकेत सनी पहिल्यांदाच दिसणार आहे. सनी त्याच्या पहिल्या नेटफ्लिक्स सिनेमाच्याही विचारात आहे. पण लॉकडाऊन झाल्यानंतर हा विचार केला जाणार आहे. राजकुमार संतोषी च्या फतेह सिंह प्रोजेक्टमध्ये सनी दिसणार होता. पण काही कारणास्तव हा सिनेमा बारगळला.

Recommended

Loading...
Share