Exclusive: सुष्मिता सेनची कमबॅक सिरीज डच क्राईम थ्रिलरचा रिमेक

By  
on  

सुष्मिता सेन आता थ्रिलर वेबसिरीजमधून डिजिटल डेब्यु करणार आहे. राम माधवानी याचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘आर्या’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. या सिरीजच शुटिंग पुर्ण झाल्याची माहितीही सुष्मिताने दिली आहे.पण लॉकडाऊनमुळे या सिरीजचं पोस्ट प्रॉडक्शन थांबलं आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार ही सिरीज लोकप्रिय डच शो ‘पेनोजा’वर आधारित आहे. यातील भारतील सिरीजला राजस्थानची पार्श्वभूमी आहे. 

 

ही एका विधवा स्त्रीची गोष्ट आहे जी कुटुंबाचा क्राईम बिझिनेस पुढे नेत आहे. आर्या ची निर्मिती एंडेमोलशाइन एंटरटेनमेंट आणि माधवानी यांची इक्वीनटेक्स फिल्म्स द्वारा केली गेली आहे. सुश्मिता एक दशकापासून सिनेजगतापासून लांब आहे. अनीस बज्मी च्या अ‍ॅक्शन कॉमेडी 'नो प्रॉब्लम' मध्ये ती शेवटची दिसली होती. आर्या खरंतर 29 मार्चला रिलीज होणार होती. आता हा प्रिमिअर जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यापुर्वी या सिरीजसाठी काजोल, माधुरी दिक्षित यांची नावंही चर्चेत होती.

Recommended

Loading...
Share