Exclusive:सलमान विरोधात डान्सरचा गैरवर्तवणुकीचा आरोप,दाखल केली तक्रार

By  
on  

बॉलिवूडचा प्रसिध्द कोरिओग्राफर आणि डान्स रिएलिटी शोचा विजेता सलमान युसूफ खान विरोधात छेडछाडीची आणि गैरवर्तवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. सलमानने एका महिला कोरिओग्रापऱला लंडन डान्स शो संदर्भात बातचित करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी ही महिला कोरिओग्राफर त्याला भेटायला आली. त्याने तिला आपल्या कारमध्ये बोलावून तिची छेड काढली असा तिचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून चौकशी सुरु केली आहे.

तक्राररदार कोरिओग्राफर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सलमानने तिला ओशिवरातील एका कॅफेमध्ये बोलावलं आणि तिच्यासोबत शो संदर्भात बातचित केली. ही बातचित झाल्यानंतर सलमानने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसण्यास सांगितले आणि गैरवर्तवणुक करण्यास सुरुवात केली. तिने कशीतरी तिथून स्वत:ची सुटका करुन घेत घर गाठलं.

त्यानंतर सलमानने तिला जबरदस्ती आणि धमकावून दुबईन आणि त्यानंतर बहरिन येथे जाऊन डान्स परफॉर्म करण्यास भाग पाडलं. हे संपूर्ण प्रकरण ऑगस्ट 2018 मधील आहे. सलमानच्या धमक्यांमुळे ही तरुणीने उशिरा तक्रार दाखल केली.

Recommended

Share