By  
on  

PeepingMoon Exclusive : रिध्दीमा कपूरला आलियाने व्हिडीओ कॉलवर घडवलं ऋषी कपूर यांचं अंत्यदर्शन

चंदनवाडी स्मशानभूमीत आज ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आणि सिनेसृष्टीला आपल्या दमदार कामगिरीने समृध्द करणारा अवलिया अनंतात विलीन झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान नितू कपूर व रणबीर कपूर यांच्यासोबत खंबीरपणे उभी असलेली रणबीरची गर्लफ्रेंड आलियाने यावेळी अंत्यदर्शनाचं लाईव्ह ऋषीजींचे लेक रिध्दिमा कपूरला घडवलं. पण तिला अंत्यदर्शन घडवताना आलियाच्याच अश्रूंचा बांध फुटला. 

रिध्दिमाला खरं तर दिल्लीहून मुंबईला येण्याची परवानगी मिळाली होती. चार्टर्ड विमानाने लेक समारासह ती मुंबईला वडिलांच्या अंत्यसंसस्कारासाठी येणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण ती येऊ शकली नाही, त्यामुळे आलियाने व्हिडीओ कॉलवरुन तिला ऋषीजींचा अंत्यदर्शन घडवलं व दोघीही शोकसागरात बुडाल्या. 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive