By  
on  

Exclusive: जेव्हा ऋषी कपूर यांनी शेफ गॉर्डन रामसे यांना शिकवला धडा

मला कायमच वाईट वाटतं की मी ऋषी कपूर यांचा इंटरव्ह्यु कधी घेऊ शकलो नाही. पण माझ्या जवळ या अभिनेत्याच्या दोन आठवणी आहेत. या दोन्ही आठवणींचा संदर्भ मुंबईमधील ताज हॉटेलशी आहे. ऋषी उत्तम खवैय्ये होते. त्यामुळे खाण्या-पिण्यावर प्रतिक्रिया देताना अजिबात कचरायचे नाहीत. मी त्यांच्यासोबत ताजला दोन वेळा भोजन केलं आहे. या वेळा माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. 

मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत जेवलो त्यावेळी माझे मित्र हेमंत ओबेरॉय जे ताजचे हेड शेफ आहेत. त्यांनी मला पंजाबी डिश टेस्ट करण्यासाठी बोलावलं होतं. हेमंत एक शीख आहे त्याने मला सुचवलं की मी एका शीख मित्राला सोबत घेऊन यावं म्हणजे जेवणाची उत्तम टेस्ट समजेल.
मी सोबत एका सुंदर शिखणीला घेऊन गेलो. ती होती नीतू (सिंह) कपूर. ती स्वत: पंजाबी असल्याने पंजाबी जेवणाची उत्तम चव ती सांगू शकेल असं माझा अंदाज  होता. पण ती सोबत ऋषीला घेऊन आली. ते त्यावेळी चांगल्या मूडमध्ये नव्हते.
माझ्या डोळ्यासमोर ऋषी यांनी ब्लॅक लेबलची बाटली उघडली आणि स्वत:च  सेलिब्रेट केलं.

आम्ही जिथं जेवणार होतो ते रेस्तॉरंट अर्ध्या रात्री बंद व्हायचं. त्यावेळी ऋषीने मागणी केली की आम्हाला चेंबर्स मध्ये नेलं जावं. तिथे त्यांनी पुन्हा बाटली घेतली आणि हेमंतला फ्रेंच डक ए लॉरेंज बनवायला सांगितलं. यानंतर ऋषी तिथे मोठ्या आवाजात गायला लागले. हेमंत मात्र त्यांचा प्लॅन फ्लॉप झाल्याने उदास झाले होते. त्या चेंबर्सच्या डायनिंगमध्ये शोकसभेचंं आयोजन केलं होतं.  ऋषी यांचं गाणं ऐकून त्या कुटुंबाच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. नीतूने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. ऋषीला ती हात धरून तिथून घेऊन गेली.

त्यानंतर आमची दुसरी भेट ताजच्या बॉलरूमध्ये झाली. त्यावेळी  गॉर्डन रामसे हे प्रसिद्ध शेफ भारतीय दौ-यावर होते. यावेळी त्यांनी सेलिब्रिटींना भारतीय खाण्याची मेजवानी देण्याचं ठरवलं. त्यावेळी ऋषी आणि नीतू माझ्या टेबलवर होते. मला वाटत होतं आता इथे नक्कीच आतीषबाजी होणार.  गॉर्डन रामसे यांनी बनवलेलंं जेवण खुप वाईट होतं.

भरीस भर म्हणजे त्यांनी स्वत: बनवलेलं भारतीय जेवण कसं  उत्तम होतं याची बढाई ही मारायला सुरुवात केली. याचदरम्यान ऋषी यांना राग अनावर झाला. 'खुप वाईट जेवण आहे हे' असं मोठ्याने ओरडले. इतरांनीही ऋषी यांच्या आवाजात आवाज मिसळला.  ऋषी यांनी मोठ्याने हाक मारत हेमंतला बोलावलं. त्यानंतर हेमंत शांतपणे सगळ्यांसाठी जेवण बनवायला निघून गेले. त्याच दिवशी  गॉर्डन रामसे शेवटची फ्लाईट पकडून निघून गेले.

Recommended

PeepingMoon Exclusive