By  
on  

Exclusive: या कारणास्तव रिध्दिमा कपूर वडिल ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनापासून राहिली वंचित

भारतीय सिनेसृष्टीला समृध्द करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं काल गुरुवारी सकाळी निधन झालं. इरफान खान पाठोपाठ बॉलिवूडचा हा आणखी एक तारा निखळला. काल तमाम चाहत्यांना आपलंसं करणारा हा प्रतिभासंपन्न कलाकार अनंतात विलीन झाला. पण अनेकांना एक प्रश्न पडला , ऋषीजींची लेक रिध्दिमा कपूरसाठी अंत्यसंस्काराची वेळ पुढे ढकलण्यात का आली नाही.  जसं रिध्दीमाला दिल्लीहून मुंबईला प्रवास करण्यासाठी पाच जणांचा पास जारी करण्यात आला होता. पण तरीही ती येईपर्यंत अंत्यसंस्कारविधी थांबविण्यात आला नाही. 

हा विषय संवेदनशील असला तरी, मुलीला वडिलांचं अखेरचं दर्शन घेता न येणं ही निश्चितच चटका लावून जाणारी बाब आहे. पण पिपींगमूनला या गोष्टीचा एक्सक्ल्युझिव्हरित्या खुलासा झाला आहे. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले ऋषी कपूर हे करोना रुग्ण नव्हते. पण आरोग्यमंत्रालयाच्या सूचनांनूसार सर्व पार्थिवांचे वेळेत अंत्यसंस्कारविधी पार पडणं आवश्यक असल्याने कपूर कुटुंबियांनी या सूचनांचं पालन करत मरीन लाईन्स येथील चंदनवाडी रुग्णालयात त्यांच्या पार्थिवावर त्वरित अंत्यसंस्कार केले. तसंच १२ तासांच्या आत अंत्यंसस्कार पार्थिवावर होणं गजेचं आहे. तर रिध्दीमाला दिल्लीहून मुंबईला प्रवास करत यायला आणखी २४ तास लागणार होते. त्यामुळे ही रिस्क घेणं परवडण्यासारखं नव्हतं, कारण मुंबईत आधीच करोना प्रादुर्भाव वेगाने पसरतोय. त्यात इन्फेक्शनचा धोका अधिक होता. 

म्हणूनच ऋषीजींवर अंत्यसंस्कार लवकरात लवकर पार पाडण्याचं कपूर कुटुंबियांनी ठरवलं. हॉस्पिटल स्टाफने पूर्ण तयारिनीशी पार्थिवावर योग्य तो काळजीपूर्वक पेहराव चढवला. परंतु कोणालाही पार्थिवाला स्पर्श करण्याची अनुमती नव्हती. प्रार्थना, गंगेचं पाणी अशा सर्व हिंदू रितीरिवाजानुसार पध्दतशीरपणे अंत्यसंस्कार पार पडले. फक्त उणीव बासली ती त्यांची लेक रिध्दीमाची. परंतु आलियामुळे ती कसर भरुन गेली. तिने व्हिडीओ कॉलवर रिध्दीमाला वडिलांचे अंत्यसंस्कार विधी घडवले. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive