By  
on  

Exclusive: ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा 'शर्माजी नमकीन'चं फक्त तीन दिवसांचं शूटींग राहिलं अपूर्ण

बॉलिवूडचे चमकते  दोन तारे अकस्मात निखळले. इरफान खान याने बुधवारी जगाचा निरोप घेतला तर ऋषी कपूर यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. इरफान खानचा शेवटचा सिनेमा अंग्रेजी मिडीयम हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध आहे. पण यापूर्वीच तब्येत खालावल्याने त्यानं कुठलंच सिनेमा प्रोजेक्ट घेतलं नव्हतं. परंतु बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्याजवळ एक सिनेमा होता ज्याचं लॉकडाऊनमुळे तीन दिवसांचं शूट हे अपूर्ण राहिलं होतं. 

शर्माजी नमकीन हा ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा ठरला. यातले काही महत्त्वाचे सीन्स, शॉट्स हे आता त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे निर्माते आता जरा अडचणीत सापडले आहेत. यावर विविध प्रकारचे उपाय काय असतील हे शोधायचा हा त्यांचा प्रयत्न सुरु  आहे. 

पिपींगमूनला शर्माजी नमकीन सिनेमाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्ममेकर लॉकडाऊन संपल्यावर एकदा फायनल एडीट चेक करुन जिथे गरज आहे त्याभागाबाबत निर्णय घेऊन कथानकात थोडाफार बदल करतील, पण सिनेमा पुन्हा परत शूट केला जाणार नाही, एवढं मात्र निश्चित. 

शर्माजी नमकीन हा हलका-फुलका विनोदी सिनेमा आहे. एका ६० वर्षीय वृध्दाची गोड कथा यात पाहायला मिळणार आहे. मागच्या वर्षी  कॅन्सरवर उपचार घेऊन न्यूयॉर्कमधून भारतात परतल्यावर ऋषीजी यांनी हा पहिला सिनेमा साईन केला होता. तसंच यात अभिनेत्री जुही चावला त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर करतेय. तर लक बाय चान्स हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. हितेन भाटीया हा नवोदित दिग्दर्शक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. मागच्यावर्षी दिल्ली येथे शर्माजी नमकीनच्या शूटींगला सुरुवात झाली होती, परंतु आता जगासह देशावर कौसळलेल्या करोना संकटामुळे ती थांबवावी लागली. 

 

 

तसंच दीपिका पादुकोणसह  ऋषी कपूर यांनी द इटर्नच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार होते. पण ह्या प्रोजेक्टवर काम सुरु होतं. प्रत्यक्ष फ्लोअरवर मात्र कुठलंच काम सुरु झालं नव्हतं. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive