By  
on  

A Blast from The Past, नीतू यांनी शेअर केल्या मुलांना वाढवतानाच्या खास आठवणी

‘ती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटते’ रणबीर त्याच्या आईचं कौतुक करत म्हणतो. मी बॉम्बे टाईम्सचा एडिटर होतो यावेळी या दोघांचा मदर्स डेसाठी इंटरव्ह्यु घेत होतो. त्यावेळी मी ‘गेस्टएडिट’ हे खास सदर सुरु केलं होतं. रणबीरच्या बोलण्यावर नीतू सहमती दर्शवते. त्यानंतर ती म्हणते, 21 व्या शतकात आईची जबाबदारी जरा जास्तच वाढली आहे. रणबीर यावर अगदी सहज मान डोलवतो.

कारण हे वाक्य त्याने आईकडून बरेचदा ऐकलं असतं. नीतू रणबीर आणि रिधीमाची अत्यंत काळजी घेणारी आई आहे. या पुरवणीसाठी नीतू एडिटर असल्याने रणबीर आपसूकच असिस्टंट एडिटर बनला होता. नीतू म्हणते, ‘30 वर्षांपुर्वी असलेल्या आईच्या जबाबदा-यांपेक्षा आताच्या जबाबदा-या खुप वेगळ्या आहेत.’ 1978 मधील धन दौलतनंतर नीतूने लग्न केलं आणि सिनेसृष्टीला रामराम करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली.

 

‘ मला मुलांसाठी घरीच राहायचं होतं. मुलांनी मला आंतर्बाह्य ओळखावं असं वाटायचं. आईसाठी मुलांशी असलेला संवाद खुप महत्त्वाचा असतो. मी त्यांच्या टीनएजमध्ये अनेकदा त्यांना सल्लेही दिले आहेत. खासकरून रिधीमाला. मला माहिती होतं रणबीर त्याच्या जबाबदा-या ओळखेल. पण मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही.’ 

मुलांना कोणते सल्ले देण्याविषयी एकदम आठवून नीतू म्हणते, मी अनेक विषयांवर त्यांच्याशी बोलली आहे. जसं की ड्रग्ज, अतिप्रसंग, नकोसं मातृत्व, लैंगिक शिक्षण या विषयांवर त्यांच्याशी खुप बोलले आहेत. रणबीर माझ्यावर खुप चिडायचा त्याला मी सतत सल्ले द्यायची. त्याला काय खावं काय खाऊ नये याबाबत सतत सांगायचे. त्याची खुप चिडचिड व्हायची. अर्थात तो कपूर असल्याने त्याला खायची आवड होतीच. पण आता दोघंही खुप फिट आहेत. 

इतर आईंना सल्ला देताना नीतू म्हणते, ‘चुक होणं सहाजिक आहे हे तुमच्या मुलांना शिकवा. चुकातून कसं शिकायचं हे देखील शिकवा. मुलांना आभार मानयला शिकवणं प्रत्येकाशी उत्तम वागणं हे देखील शिकवा. तुम्ही उत्तम विचारात वाढलेला असाल तर त्याचं प्रतिबिंब वागण्यात पडतंच. 

याशिवाय, ‘मुलांना चुका स्विकारायला शिकवा. अनेक मुलं ड्र्ग्जच्या आहारी जातात. , लैंगिक शिक्षण, एड्स याबाबत मुलांशी मोकळेपणाने बोला. यानंतर रणबीरच्या केसातून हात फिरवत त्या म्हणतात, ‘तुमच्या आई-वडिलांना कधीही एकटं सोडू नका. निदान एक मुल तरी म्हातारपणी त्यांच्यासोबत राहायला हवं. ऋषी आणि नीतू त्यावेळी पन्नाशीत होते. ‘दो दुनी चार’ मधून हे दोघेही परत भेटीला आले होते.

 

Recommended

PeepingMoon Exclusive