Exclusive: शर्मन जोशी दिसणार अब्बास-मस्तानच्या वेबसिरीजमध्ये, नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

By  
on  

अभिनेता शर्मन जोशी आता पेंटहाऊस या सायकॉलॉजिकल वेबसिरीजमधून समोर येणार आहे. अब्बास-मस्तान ही जोडी ही सिरीज सादर करणार आहे. लॉकडाऊनमुळे ही सिरीज रिलीज व्हायला उशीर होत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार’ अब्बास मस्तान पुन्हा एकदा लाडका थ्रिलर जॉनर घेऊन परत येत आहेत. या सिरीजमध्ये शर्मन जोशी मुख्य भूमिकेत असतील.

एप्रिलच्या सुरुवातीला या सिरीजचं शुटिंग सुरु होणार होतं. पण लॉकडाऊनमुळे याला उशीर झाला आहे. ही सिरीज नेटफ्लिक्सचा ओरिजिनल कंटेट आहे. शर्मनने ‘बारिश’मधून डिजीटल डेब्यु केला आहे. आता या सिरीजचा दुसरा सीझनही आला आहे. तर अब्बास मस्तान यांनी 2 वर्षांपुर्वी मशीन सिनेमा प्रस्तुत केला होता. यात अब्बास यांचा मुलगा मुस्तफा झळकला होता. हा सिनेमा फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता.

Recommended

Loading...
Share