Exclusive: शहीद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या बायोपिकमधून झायेद खान करतोय पुनरागमन

By  
on  

भारतीय फिल्ममेकर्सना नेहमीच आर्मी ऑफीसर व सैनिकांच्या जीवनाव आधारित सिनेमा करण्याचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. अनेकांच्या जीवनावर आधारित जीवनपटावरुन त्यांचा संघर्ष, वैयक्तिक आयुष्यप्रेक्षकांसाठी उलगडण्यात आलं आहे. अरुण खेतरपाल, विजय कर्णिक, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यानंतर आता आणखी एका व्यक्तिमत्त्वावर जीवनपट येतोय. 

पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, ब्रिगेडीअर मोहम्मद उस्मान यांच्या  बायोपिकची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांनुसार संजय खान या बायोपिकची निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत.  १९४७ च्या भारत-पाकिस्तान युध्दादरम्यान मोहम्मद उस्मान हे सैन्य अधिकारी होते व त्यांची या युध्दात ते शहीद झाले. ते हाईएस्ट रॅकींग अधिकारी म्हणून गणले जात.  त्यांच्या जीवनावर या सिनेमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यांची सिनेमात शौर्यगाथाच पाहायला मिळणार आहे. 

चंडी सोना (1977), अब्दुल्लाह (1980), काला धंदा गोरे लोग (1986)  अशा सिनेमांचं संजय खान यांनी दिग्दर्शन केलं आहे. या मोहम्मद उस्मान यांच्या जीवनपटाद्वारे संजय खान यांचा मुलगा झाएद खान हा ब-याच काळानंतर म्हणजे  मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शेवटचा तो शाहरुख खान, सुष्मिता सेन, अमृता राव यांच्या सोबतच्या सुपरहिट मै हूं ना सिनेमात झळकला होता. 

 

भारतीय सैन्यदलातील ब्रिगेडीयर मोहम्मद उस्मान या मुस्लिम अधिका-याला नौशेरा का शेर असं म्हटलं जायचं. ते अवघे २० वर्षाचे असताना भारतीय सैन्यात अधिकारी झाले होते. ते पहिले असे अधिकारी होते त्यांच्यासाटी शत्रूराष्ट्र पाकिस्तानने त्यांच्यावर तब्बल ५० हजारांचं बक्षिस ठेवलं होतं. 

Recommended

Loading...
Share