Exclusive: अनुष्का शर्माच्या पुढील सिरीजमध्ये साक्षी तंवर आणि रायमा सेन यांची वर्णी

By  
on  

अनुष्का शर्माची पाताललोक सिरीज रिलीज होते न होते तोच ती पुढील सिरीजच्या तयारीला लागली आहे. ‘माई’ नावाच्या सिरीजची निर्मिती अनुष्का नेटफ्लिक्ससाठी करणार आहे. अनुष्काने यासाठी साक्षी तंवरची निवड मुख्य भूमिकेत केली आहे. साक्षी 47 वर्षीय मध्यमवर्गीय स्त्रिच्या भूमिकेत दिसणार आहे. जी एक डॉन देखील आहे. साक्षी आतापर्यंतच्या अवघड भूमिकेत दिसणार आहे. 

साक्षीसोबत या सिरीजमध्ये रायमा सेनही दिसणार आहे. यासोबतच यासिरीजमध्ये अनेक टॅलेंटेड कलाकार दिसणार आहेत. पण त्यांची नावं अजून समोर आली नाहीत. माई अशा स्त्रीची कथा आहे. जी अचानक हिंसा आणि सत्तेच्या खेळात अडकते. तिच्याकडून चुकुन एका माफिया नेत्याचा खुन होतो. पण त्यानंतर अपराध आणि राजनितीचा ती भाग बनते. 

या सिरीजचं दिग्दर्शन अतुल मोंगिया करत आहेत. तर पटकथा तमले सेन आणि अमिता व्यासने लिहली आहे. या सिरीजची शुटिंग लखनऊमध्ये सुरु होणार होतं. पण लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला आहे. माई अनुष्का शर्माचं हे तिसरं वेब प्रॉडक्शन आहे. अमेझॉन प्राईमच्या पाताल लोक नंतर नेट्फ्लिक्सची बुलबुल ही सिरीज देखील पाईपलाईनमध्ये आहे.

Recommended

Loading...
Share