Exclusive: नेटफ्लिक्सच्या दिल्ली क्राईम 2 चं दिग्दर्शन राजेश मापुस्कर आणि तनुज चोप्रा करणार

By  
on  

नेटफ्लिक्स त्याच्या दिल्ली क्राईम या वेबसिरीजचा दुसरा सीझन घेऊन येण्यास सज्ज झालं आहे. पहिल्या सीजनमध्ये बलात्काराची केसनंतर आता दिल्लीमधील हाय प्रोफाईल केस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सीझनमधील शेफाली शाह, रसिका दुगल, आदिल हुसैन, राजेश तैलंग हे कलाकार या सीझनमध्येही दिसणार आहेत. पण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शनाची धुरा आता रिची मेहता यांच्या हाती नसणार आहे.

 

वेंटिलेटर या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे या सिरीजचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय कॅनडाचे दिग्दर्शक तनुज चोप्रा हे देखील सहदिग्दर्शक असणार आहेत. 
पहिला सीजन संवेदनशील हाताळणीसाठी गाजला होता. दुसरा सीझन नक्की कशावर आहे हे समोर आलं नाही. तरीही 2006 मधील निठारी कांडवर आधारित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सीझनच्या शुटिंगची सुरुवात जानेवारीमध्ये झाली होती. आता या सिरीजचा शेवटचा टप्पा बाकी आहे. लॉकडाऊननंतर हा पुर्ण केला जाईल. ही सिरीज पुढील वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share