Exclusive: ‘घुमकेतू’नंतर नवाजुद्दीनचा ‘रात अकेली है’ देखील दिसणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर?

By  
on  

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज 46 वा वाढदिवस साजरा करत असला तरी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. पण त्यात एक चांगली बातमी देखील आहे. नवाजुद्दीनचा क्राईम थ्रिलर सिनेमा ‘रात अकेली है’ वेबप्लॅटफॉर्मवर रिलीज व्हायची शक्यता आहे. 

 

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, हनी त्रेहन या सिनेमातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. त्यामुळे हा सिनेमा रिलीजसाठी ते जास्त काळ वाट पाहू शकत नाहीत. नवाजुद्दीनसोबत या सिनेमात श्वेता त्रिपाठी देखील आहे. नवाजुद्दीन आणि राधिकाची जोडी जवळपास 5 वर्षांनी स्क्रीन शेअर करणार आहे.

लॉकडाऊननंतर बिग बॅनर सिनेमे रिलीजसाठी तयार असल्याने लहान सिनेमांना थिएटर मिळण्याची शक्यता फारशी नाही. त्यामुळेच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. नवाजुद्दीनचा आणखी एक सिनेमा ‘घुमकेतू’ वेबप्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी तयार आहे. हा सिनेमा 22 मे ला झी 5 वर रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share