PeepingMoon Exclusive : दानशूर अक्षय कुमार पुन्हा मदतीला धावला, १,५०० मजूरांसाठी CINTAA केली ४५ लाखांची मदत

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा ख-या आयुष्यातसुध्दा खिलाडी असल्याचं तुम्हाला वेगळं सांगायला नको. करोना संकटात त्याच्या दानशूरपणाचा सर्वांनाच चांगलाच प्रत्यय आला आहे. वेळोवेळी गरजोनुसार तो आपलं मदत कार्य सुरुच ठेवतो आहे.तुम्हाला माहितच आहे, जागतिक करोना महामारीमुळे बंधनकारक असलेला लाँकडाऊन, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. हातावर पोट असलेल्या अनेक मजुरांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना आता दोनवेळ काय खायचं हा प्रश्न सतावतोय, कारण हाताला काम नाही तर पोटाला अन्न नाही अशी त्यांची गत झाली आहे.

पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार  CINTAA च्या सह सचिवांना फंड कमी पडत असल्याने कामगारांना मदत कशी करायची ही चिंता भेडसावत होती. परंतु अक्षय कुमारला ही बातमी निर्माता साजिद नाडियाडवालमार्फत समजली आणि त्याने त्वरित सोमवारी ४५ लाखांची CINTAA ला मदत केली. तो देवासारखाच नेहमीप्रमाणे धावून आला. आता CINTAA मार्फत प्रत्येक सदस्याला ३,००० रुपये महिना त्यांचं काम सुरु होईपर्यंत मिळणार आहे. अक्षय प्रमाणेच सलमान खाननेसुध्दा Western Indian Cine Employees (FWICE) च्या रोजंदारीवर काम करणा-या कामगाांना असाच मदतीचा हात पुढे केला होता. 

CINTAA ने  अक्षय कुमारचे मनापासून आभार मानले आहेत. यावेळी CINTAA चे अध्यक्ष प्रसिध्द मराठी अभिनेते विक्रम गोखले यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सचिव आणि प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंगने पिपींगमूनला सांगितलं, अक्षय सरांच्या या दानशूरपणाचं आम्हा सर्वांनाच खुप कौतुक आहे. त्यांचा आधार वाटतो.  मंगल पांडे आणि अग्निपथ सारख्या सिनेमांमध्ये काही चरित्र भूमिका साकारणारा अभिनेता राज कीर म्हणाला, आमच्यासारख्या स्ट्रगल करणा-यांच्या खात्यात अक्षय सरांमुळे ३००० रुपये जमा होणार याचा आम्हाला आनंद आहे. 

 पंतप्रधान सहाय्यता निधीला २५ कोटींची मदत केल्यानंतरसुध्दा  करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला , गरजुंना तो मदत करतोच आहे. पण  आपण सुरक्षित राहता यावं म्हणून अहोरात्र झटणा-या पोलिसांच्या सुरक्षेसाठी त्याने मदतीचा हात दिला आहे. बॉलिवुडच्या या खिलाडी कुमारने मुंबई पोलिसांना सेन्सॉर असलेले १ हजार मनगटावर बांधायचे हेल्थ बॅण्ड पुरवले आहेत. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share