PeepingMoon Exclusive: सुशांत सिंहच्या बहिणीने क्राईम ब्रांचला सांगितलं, 'भाई ठीक नहीं थे'

By  
on  

बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं.  मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहते आणि कलाविश्व आज शोकसागरात बुडालं. त्याचं जाणं चटका लावून तर गेलंच पण आत्महत्येचं गूढ अद्याप अस्पष्टच आहे. 

दरम्यान पिपींगमूनच्या हाती एक एक्स्क्ल्युझिव्ह वृत्त आलं आहे. चौकशी दरम्यान सुशांत सिंहच्या बहिणीने क्राईम ब्रांचच्या टीमला एक महत्त्वपूर्ण माहिती दिलीय.  'भाई ठीक नहीं थे' असं तिने त्यांना सांगितलंय. 

सुशांतची बहिण मितू सिंह ही त्या लोकांपैकी एक आहे जी वांद्रे येथील क्वार्टर रोड परिसरातील इमारतीत सुशांतच्या मित्रांसह तिनेसुध्दा त्याला पंख्याला गळफास घेतलेलं पाहिलंय. तिने मुंबई क्राईम ब्रांचला स्पष्ट केलं, की माझा भाऊ मागच्या आठवड्यापासून चांगल्या मनस्थितीत नव्हता. तो अस्वस्थ होता कारण त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक उतार-चढाव येत होते. 

 

सुशांतच्या कुटुंबियांना सुशांत व त्याच्या अभिनेत्री गर्लफ्रेंडमध्ये असलेल्या तणावाबाबत माहिती होती. पण ती गर्लफ्रेंड घर सोडून गेल्याचं सुशांतने कधीच कुटुंबियांना सांगितलं नाही. पण बहिण मीतूला ही गोष्ट समजल्यावर तिने त्याच्या गर्लफ्रेंडला काय बिनसलंय म्हणून विचारण्यासाठी फोन केला, पण त्याच्या गर्लफ्रेंडने तिचा फोन घेतला नाही. 

Recommended

Loading...
Share