By  
on  

Exclusive: ओपन वॉटर स्विमर भक्ती शर्माच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती भुषण कुमार करणार

बॉलिवूडमध्ये कायम राहणारा ट्रेंड म्हणजे बायोपिक. बॉलिवूड अनेक बायोपिकनी सजलं आहे. आता आणखी एका बायोपिकसाठी बॉलिवूड सज्ज आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार टी सिरीज एका जलतरणपटूच्या जीवनावर बायोपिक बनवणार आहे. 
भक्ती शर्मा असं या जलतरणपटूचं नाव आहे. भक्ती अंटार्टिका महासागरात जलतरणाचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवणारी पहिली आशियायी आणि जगातील सर्वात कमी वयाची महिला आहे.

 

टी-सिरीज मागील वर्षापासून या बायोपिकवर काम करत असून पुढील वर्षी याला रोल करणार आहे. भवानी अय्यर ही बायोपिक लिहित आहेत. यापुर्वी त्यांनी 'लूटेरा', 'ब्लॅक', 'राजी' या सिनेमांची स्क्रिप्ट लिहिली आहे. जलतरणावर बनणारा हा बॉलिवूडमधील पहिलाच सिनेमा आहे. 1 डिग्री तापमान असलेल्या समुद्रात पोहोण्याचा विक्रम भक्तीच्या नावावर आहे. याशिवाय भक्तीने जवळपास 5 महासागरात पोहोण्याचा विक्रमही तिच्या नावावर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive