PeepingMoon Exclusive : सुशांतनेच मला घराबाहेर जायला सांगितलं होतं, रियाची पोलिसांना माहिती

By  
on  

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं दिसतंय. काल १८ जून रोजी वांद्रे पोलिसांनी सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीची जवळपास आठ तास कसून चौकसी केल्यानंतर या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पिपींगमूनला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने तिच्या जबाबात ती व सुशांत राहत असलेलं अपार्टमेंट हे भयावह म्हणजेच हॉंन्टेड असल्याचा आश्चर्यजनक खुलासा केला आहे. 

तसंच सुशांत याच कारणास्तव सारखा नैराश्यानेग्रस्त असल्याचं रिया सांगते. तसंच दोघांचंही नातं बरंच पुढे गेलं होतं व ते लवकरच लग्न करणार होते, परंतु सुशांतच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं,पण नंतर गोष्टी बदलल्या होत्या. व ते हे नातं स्विकारायला तयार झाले. मी त्याचे वडील के.के. सिंह यांच्याशी एक-दोनवेळा बोललेसुध्दा होते.

तसंच रियाने पोलिसांसमोर सुशांतसोबतच्या नात्याची कबुली देत हेही सांगितलं की आम्ही एकमेकांना २०१२ सालापासून ओळखतो. आम्ही दोघंही त्यावेळी वेगवेगळया प्रोजेक्ट्समध्ये बिझी होतो. पण तरीही पार्ट्यांमध्ये आमच्या गाठी-भेटी होत राहायच्या. त्या दरम्यान सुशांत  दुस-या कोणालातरी डेट करायचा, पण आम्ही मित्र म्हणून एकमेकांच्या टचमध्ये होतो. त्यानंतर एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये एकत्रच काम करत होतो. पण  आम्ही त्या प्रोजेक्टला एकत्रच रामराम ठोकला कारण ते खरं टॅलेंट डावलत असल्याचं आम्हाला जाणवलं, मग आम्ही आमच्या करिअरची स्वतंत्र सुरुवात करायचं ठरवलं, तेव्हा २०१७-१८ मध्ये आम्ही एकमेकांना डेट करु लागलो. 

 

रिया पोलिसांपुढे स्पष्ट करते, सुशांतने त्याच्या नैराश्याची मला कधीच कल्पना दिली नाही. कधीच त्याने त्याबाबत काही शेअर केलं नाही. तो टेन्मध्ये असला की एकटं राहणंच पसंत करायचा. तसंच आमच्या प्रोफेशनल लाईफचा आमच्या व्यक्तिगत नात्यावर खुप परिणाम व्हायचा. विनाकारण त्याने अनेक सिनेमे गमावले होते. त्याच्या हातून काम निसटून जात होतं. तो नैराश्येत होता. शेवटच्या काही दिवसांत त्याने मानसोपचारतज्ञांनी दिलेली औषधंही तो घेत नव्हता. 

तसंच घर सोडण्यामागचं कारणही रियाने यावेळी स्पष्ट केलं. ती सांगते, मी स्वत:हून घर सोडलं नाही तर मला सुशांतनेच घराबाहेर जाण्यास सांगितलं. मी तो टेन्शनमध्ये असल्याचं पाहून काहीही  प्रश्न न विचारता घर सोडलं. मला वाटलं काही दिवसांतच गोष्टी ठीक होतील, त्याला वेळ देऊयात. 

Recommended

Loading...
Share