PeepingMoon Exclusive : रिया आणि तिचा भाऊ सुशांत सिंह राजपुतसोबत होते बिझनेस पार्टनर, पोलिसांपासून लपवली माहिती?

By  
on  

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली रियाने मुंबई पोलिसांना दिली, पण दोघंही बिझनेस पार्टनर म्हणूनही काम करत असल्याचं समोर येतंय परंतु पिपींगमूनला मिळालेल्या सूत्रांच्या वृत्तानुसार  रियाने ही माहिती पोलिसांपासून लपवल्याचं समजतंय. 

 सुशांत सिंह राजपूतने सर्वात पहिली कंपनी २०१८ साली सुरु केली होती. ही कंपनी आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, वर्च्युअल रिऍलिटी आणि ऑगुमेंटेंड रिऍलिटी वर काम करते. याशिवाय त्यानं आपली दुसरी कंपनी गेल्या वर्षी २०१९मध्ये सुरू केली होती.

सुशांतच्या दुसऱ्या कंपनीचं नाव Vividrage Rhealityx आहे. हे नाव त्यानं आपली गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या नावावर ठेवलं होतं. ही कंपनी पण मिक्स्ड रिऍलिटी आणि टेक्निकल क्षेत्रात काम करते. रिया चक्रवर्ती या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये पण आहे. तसंच रियाचा भाऊ शोविक हा सुध्दा या कंपनीत भागीदार होता. सर्व पैसे हे सुशातंने गुंतवले होते. रिया व तिचा भाऊ शोविक यांनी एक रुपयासुध्दा यात गुंतवला नसल्याचं समजतंय. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करणं सर्वांनाच चटका लावून गेलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिस सर्व धागेदोरे तपासून पाहत आहेत. याप्रकरणी त्याच्यासोबत राहत असलेली त्याची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांनी कसून चौकशी केली असून जबाब नोंदवला आहे. पण रियाने पोलिस चौकशीत आपण सुशांतची बिझनेस पार्टनर पण होतो ही माहिती लपवल्याचं सुूत्रांकडून समजतंय.

Recommended

Loading...
Share