Exclusive: दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन झळकणार सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत

By  
on  

पीपिंगमूनने 22 जूनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार ‘गली बॉय’ फेम सिद्धार्थ चतुर्वेदी एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी सिनेमात दिसणार होता हे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. रवी उदयवार दिग्दर्शित या सिनेमासाठी सिद्धार्थने मार्शल आर्टचं ट्रेनिंग घ्यायलाही सुरुवात केली आहे. 

 

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या बॅनरखाली हा सिनेमा बनत आहे. मालविका मोहनन हा सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालविका या सिनेमात ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती काही स्टंट्स देखील करताना दिसेल. सिद्धार्थ देखील या सिनेमात स्टायलिश भूमिकेत दिसणार आहे. 

‘बंटी और बबली 2’ चं शुटिंग संपल्यानंतर तो या सिनेमाला सुरुवात करेल. बंटी और बबली 2 मध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे दिसत आहे. हा सिनेमा पुढील जानेवारीपर्यंत फ्लोअरवर जाईल. फरहान अख्तर या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित आहे.

Recommended

Loading...
Share