By  
on  

Exclusive: सुशांत सिंग राजपुत आत्महत्येप्रकरणी गर्लफ्रेंड रिया चक्रबोर्ती आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल

सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रबोर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी पटना येथील राजीव नगर पोलिस स्टेशनमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात काही निष्पन्न न झाल्याने त्याच्या वडिलांनी हा गुन्हा नोंदवला आहे. सुशांतचे वडील के. के सिंग यांनी IPC Section  341, 342, 380, 406, 420 आणि 306 कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मानसिक त्रास देणे, आत्महत्येस प्रवृत करणे असे आरोप सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर केले आहेत.     

सुशांतच्या अकाउंटमधून 17 कोटी रुपये गायब आहेत. या संदर्भात रिया तिचे वडील, आई, भाऊ आणि मित्र यांनी या पैशांची अफरातफर केली असल्याचं के के सिंग यांचं म्हणणं आहे. रिया चक्रबोर्ती, इंद्रजित चक्रबोर्ती, संध्या चक्रबोर्ती, शौमिक चक्रबोर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी या पाच जणांनी सुशांतच्या आत्महत्येला पुरक असं वातावरण तयार केलं असंही के के सिंग म्हणाले. 

डॉक्टर असलेले रियाचे वडील हे सुशांतवर उपचार करत होते. यावेळी सुशांतला काय औषधं दिली गेली याच्याबाबत कोणतीही माहीती त्यांनी समोर येऊ दिली नाहीत. याशिवाय चक्रबोर्तींनी हळू हळू सुशांतला त्याच्या कुटुंबापासून लांब नेलं असाही आरोप यावेळी त्याच्या वडिलांनी केला आहे. 

के के सिंग यांनी अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी स्वतंत्र तपास पथक नेमण्याची मागणीही त्यांनी केली. चार सदस्यांचं एक पथक मुंबईला पाठवलं जाणार आहे. यात दोन इन्स्पेक्टर आणि दोन सबइन्स्पेक्टर यांचा समावेश असलेलं हे पथक मुंबई पोलिसांकडून केस डायरी तसंच इतर महत्त्वाची कागदपत्रं हाती घेईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive