Exclusive: सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी एक्स गर्लफ्रेंड आंकिता लोखंडेचीही पटना पोलिस चौकशी करणार

By  
on  

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येचा तपास पटना पोलिसांनी हातात घेतला आहे. या प्रकरणात आता अंकिताचाची जबाब नोंदवला जाणार आहे. पटनाचे आय जी संजय सिंह यांनी सांगितलं की अंकिताजवळ सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे असल्याने तिची चौकशी केली जाणार आहे. 

 

सुशांतने त्याच्या मानसिक स्थितीबाबत त्याने अंकिताला सांगितलं होतं. त्यावेळी अंकिता तिच्या मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. त्यावेळी सुशांतने तिला विश करण्यासाठी मेसेज केला होता. त्यावेळी झालेल्या चॅटमध्ये सुशांतने अत्यंक भावूक होऊन रिया त्याला त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. रियासोबतचं नातं त्याला संपवायचं होतं. त्याची अवस्था स्वत:च्या घरात कैद्याप्रमाणे झाल्याचंही सांगितलं होतं. 
अंकिताने हे सगळं चॅट सुशांतच्या घरच्यांना आणि पोलिसांना दाखवलं आहे. बिहार पोलिस याची चौकशी करत आहे.

Recommended

Loading...
Share