PeepingMoon Exclusive: 'बेलबॉटम'च्या शूटींगाठी स्कॉटलंडला जाण्यापूर्वी अक्षय कुमार आज करणार नव्या सिनेमाची घोषणा?

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी सुपरस्टार किती वर्कहोलिक आहे , हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याची प्रचिती त्याच्या वर्षाला प्रदर्शित होणा-या सिनेमांमधून होतच असते. लॉकडाऊननंतर पुन्हा अक्षय कुमारचा वर्क मोड जबरदस्त अंदाजात ऑन झाला आहे.

जॅकी भगनानीच्या बेलबॉटम या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी या सिनेमाची संपूर्ण टीम येत्या गुरुवारी स्कॉटलंडला निघाली आहे. पण याच दरम्यान पिपींगमूनच्या हाती एक एक्सक्ल्युझिव्ह बातमी आली आहे, ती म्हणजे अक्षय कुमार शूटींगला परदेशी निघण्यापूर्वी आज त्याच्या एका आगामी नव्या-को-या सिनेमाची घोषणा करतोय, त्यामुळे त्याचा सोशल मिडीयावर सर्वांच्याच नजरा आज खिळून राहतील यात शंका नाही. 

सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार ज्या सिनेमाबद्दल आणि त्याच्या कथेबद्दल प्रचंड उत्सुक आहे. त्याची घोषणा तो आज सोशल मिडीयावरुन करणार आहे. आगामी बेलबॉटमच्या स्कॉटलंड येथे ४५ दिवसांच्या शूटींगसाठी जाण्यापूर्वी त्याला ही बातमी चाहत्यांना सांगायची आहे. 

 

 

करोना संकट आणि लॉकडाऊननंतर परदेशात शूटींग होणारा बेलबॉटम हा बॉलिवूडचा पहिला-वहिला सिनेमा ठरतोय. तसंच स्कॉटलंड  येथे पोहचल्यावर  शूटींगचा श्रीगणेशा करण्यापूर्वी या सिनेमाच्या टीमला ९ दिवसांचा क्वारंटाईन काळ घालवावा लागणार आहे. 

दरम्यान, अक्षय कुमारच्या आजच्या सिनेमाबाबतच्या घोषणेकडे चाहते चातकासारखे वाट पाहतील.

 

 

Recommended

Loading...
Share