PeepingMoon Exclusive: YRF च्या 'पठान'मध्ये शाहरुख आणि जॉन अब्राहम येणार आमने-सामने

By  
on  

यशराज फिल्म्स बॅनर पुन्हा एकदा शानदार कास्ट सह सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान (2018),  'वॉर' अशा धमाकेदार  सिनेमांनंतर PeepingMoon.com ला मिळालेल्या माहितीनुसार,  'पठान' या आगामी प्रोजेक्टसाठी  यशराज बॅनर शाहरुख खान आणि जॉन अब्राहमला मोठ्या पडद्यावर आमने-सामने आणणार आहे.  आदित्या चोप्राच्या यशराज बॅनरच्या या बिग बजेट  'पठान' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिध्दार्थ आनंद सांभाळतायत. 

सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार, या यशराजच्या बिग बजेट सिनेमाच्या मुख्य भूमिकांसाठी शाहरुख खान आणि जॉन अब्राहम याला साईन करण्यात आलं आहे. ह्या एक्शपटाचं भारतासह परदेशातील विविध ठिकाणी शूटींग कण्यात येणार  आहे. सिनेमाचं शूटींग येत्या जानेवारीत सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे आणि जुलैं पर्यंत सिनेमा रॅप करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. जेणेकरुन 2021 च्या अखेरपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकेल.

 जॉनचा मसाला एंटरटेनर 'सत्यमेव जयते 2' चं शूटींग संपवून तो शाहरुखला 'पठान' च्या सेटवर मार्च किंवा एप्रिलमध्ये जॉईन करु शकतो. तसंच आणखी एक महत्तवाची गोष्ट म्हणजे या सिनेमात नायिका म्हणून दीपिका पदुकोणच्या नावाची शक्यता जास्त आहे. 

 यशराज फिल्म्सचं यदांचं हे ५० वं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याचनिमित्ताने या सिनेमाची अधिकृत घोषणा पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

Recommended

Loading...
Share