Peepingmoon Exclusive: सलमानला मिळाले काळवीट शिकार आणि आर्म्स अ‍ॅक्ट मध्ये समन्स, बिग बॉस 14 च्या मेकर्सची चिंता वाढली

By  
on  

सुपरस्टार सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने 28 सप्टेंबर 2020 ला हजर होण्याचे समन्स बजावले आहेत. काळवीट शिकार आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत हे समन्स बजावले आहेत. याने बिग बॉस 14 च्या मेकर्सची चिंता वाढवली आहे. 
बिग बॉसच्या प्रिमिअरची तारीख जारी केली असताना ही बाब समोर आल्याने मेकर्सची चिंता वाढली आहे.

 

जर सलमान विरोधात एखादा निर्णय गेल्यास शुटिंगवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार सलमान 28 सप्टेंबर पुर्वीच बिग बॉस 14 आणि महत्त्वाचे इतर शुटिंग पुर्ण करून घेणार आहे. खरं तर ही सुनवाई 18 एप्रिलला अपेक्षित होती. पण करोनामुळे याला काहीसा ब्रेक लागला.

Recommended

Loading...
Share