PeepingMoon Exclusive: ‘सत्यमेव जयते -2’सिनेमात जॉन अब्राहम झळकणार तिहेरी भूमिकेत

By  
on  

बॉलिवूडचा एक्शन हिरो जॉन अब्राहमचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘सत्यमेव जयते 2’ मधून नुकताच क्रांतिकारी लुक चाहत्यांसमोर आला. यासोबतच येत्या ईदला म्हणजेच 12 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंसुध्दा उलगडलं. पण पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आणखी एक एक्सक्ल्युझिव्ह वृत्त  आलं आहे.  या सिनेमात जॉन अब्राहम चक्क तिहेरी भूमिका साकारतोय. त्यामुळे जॉनच्या चाहत्यांसाठी ही एक छान ट्रिट ठरेल यात शंका नाही. 

टी सीजची निर्मिती असलेल्या ‘सत्यमेव जयते -2’ बद्दल सिनेरसिकांना खुप उत्सुकता आहे. त्यात जॉनची तिहेरी भूमिका म्हणजे ‘सोने पें सुहागा’च.  एक शेतकरी तर एक पोलिस आणि सामान्य व्यक्ती या त्याच्या दोन भूमिकांबद्दल सूत्रांकडून समजलं आहे. परंतु त्याची तिसरी भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

सिनेमाचे दिगदर्शक मिलाप झवेरी याबाबत बोलताना म्हणाले, ‘सत्यमेव जयते-2’ हा सिनेमा भरपूर एक्शनने पॅक असेल आणि त्याच्या प्रिक्वलपेक्षाही यात बरंच जास्त धमाकेदार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  लखनौची पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारा आहे. 

 


 

तसंच आपल्या पॉवरपॅक अभिनयाने सिनेमाची नायिका अभिनेत्री दिव्या खोसला कुमार प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी व्यक्त केला आहे. तसंच लवकरच सर्व परस्थितीत आटोक्यात यावी व सिनेमागृह सुरु व्हावीत आणि ईदच्या निमित्ताने या सिनेमाचा आनंद प्रेक्षकांनी सिनेमागहातच घ्यावा, अशीसुध्दा त्यांची मनापासून इच्छा आहे. 

जॉन अब्राहमने सोशल मीडियावर  काल या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. पोस्टरवर सिनेमाची गाथा थोडक्यात सांगणारा “जिस देश की मैय्या गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है” हा डायलॉग देण्यात आला .

Recommended

Loading...
Share