Exclusive: ड्रग्ज केसमध्ये दोन टेलिव्हिजन अभिनेत्रींनाNCB समन्स पाठवणार, अभिनेत्रींचं बिग बॉसशी कनेक्शन

By  
on  

बॉलिवूड सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने बॉलिवूडनंतर आता टेलिव्हिजन सेलिब्रिटींचीही चौकशी सुरु केली आहे. टि व्ही अभिनेत्रींना एनसीबी लवकरच समन्स पाठवणार असल्याचं समोर येत आहे. चरस बाळगल्याच्या आरोपावरून अ‍ॅबीगैल पांडे आणि सनम जोहरच्या चौकशीनंतर ही बाब समोर आली आहे. अ‍ॅबीगैलने सांगितल्यानुसार या दोघींपैकी एक बिग बॉसमधील सहभागासाठी चर्चेत होती. 

 

या अभिनेत्रीला इतर अभिनेत्यांसाठी ड्रग पेडलरचं काम करते. ही अभिनेत्री त्यावेळी चर्चेत आली ज्यावेळी तिने टिव्ही शोमधील बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं होतं. ही अभिनेत्री आता एनसीबीच्या रडारवर आहे. टिव्ही कपल अ‍ॅबीगैल पांडे आणि सनम जोहरच्या घरी छापा मारल्यानंतर एनसीबीने इतर टिव्ही कलाकारांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

Recommended

Loading...
Share