By  
on  

रोवन एटकिन्सन आता मि. बीन साकारणार नाहीत, वाचा सविस्तर

फार कमी लोक असतील ज्यांना मि. बीन ही व्यक्तिरेखा माहिती नसेल. या व्यक्तिरेखेने अबालवृद्धांना खळखळून हसवलं. रोवन एटकिन्सन  यांनी  अभिनेता, लेखक आणि निर्माता अशी अनेक माध्यमातून काम केलं. आता मात्र रोवन एटकिन्सन यांनी मि. बीन ही व्यक्तिरेखा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्येही बाब स्पष्ट केली.

 

‘ मला आता ही व्यक्तिरेखा साकारण्यात मजा येत नाही. . ती व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी मला आता जड वाटते . मला ती व्यक्तीरेखा तणावपुर्ण आणि  थकवणारी वाटते. त्यामुळेच मी आता ही व्यक्तिरेखा संपवत आहे.’ 
1990मध्ये बीन यांनी ही व्यक्तिरेखा जगासमोर आणली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive