By  
on  

संदीप नाहरच्या पत्नी आणि सासू विरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल: सुत्र

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी आणि केसरी या सिनेमात काम केलेला अभिनेता संदीप नाहरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संदीपने सोशल मीडियावर एक सुसाईड नोट आणि व्हिडीओ शेअर करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. संदीपने त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर संदीपची पत्नी कांचन आणि त्याच्या मित्राने त्याला गोरेगावमधील एका रुग्णालयात नेलं. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.

 

 

गोरेगाव पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. संदीपच्या पत्नी आणि सासू विरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याचंही बोललं जात आहे. अनेक कलाकारांनी संदीपच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचा केसरीमधील कोस्टार अक्षय कुमारनेही पोस्ट शेअर करत संदीपला श्रद्धांजली वाहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive