........ म्हणून सुपरफिट असूनही मिलिंद सोमण करु शकत नाही प्लाझ्मा डोनेट

By  
on  

करोनाच्या दुस-या लाटेत संसर्ग होणा-यांची संख्या मोठी आहे. अशावेळी संसर्गाने भयाण रुप धारण करण्यापुर्वी त्याला आवर घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमणही काही दिवसापुर्वी करोनामुक्त झाला आहे. यानंतर पुन्हा वर्कआऊट जॉईन करत मिलिंदने प्लाझ्मा डोनेट करणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला होता. पण नुकतंच मिलिंदने प्लाझ्मा दान न करण्याचं कारण चाहत्यांशी शेअर केलं आहे.

 

 

‘जंगलात परत, मी मुंबईमध्ये प्लाझ्मा दान करण्यासाठी गेलो होतो. पण त्यासाठी माझ्या शरीरात पुरेश्या अँटीबॉडीज नाही. जरी प्लाझ्मा थेरपी ही शंभर टक्के प्रभावशाली असेलच असं नाही. पण ही थेरपी उपचारासाठी मदत करते आणि त्यामुळे मी आपल्याला शक्य ते करू. मला अगदी सामान्य लक्षण असल्याने या अ‍ॅंटीबॉडीज बनल्या नसल्याचं समोर येत आहे. यामुळेच मी मदत करु शकत नसल्याचं वाईट वाटत आहे.

Recommended

Loading...
Share