
पुजा सावंत अनेकदा ती प्राणीहक्कांविषयीही भरभरुन बोलताना दिसते. मुक्या प्राण्यांना इजा होऊ नये किंवा केली जाऊ नये यासाठी पुजा कायमच तत्पर असते. काही दिवसांपुर्वी पुजाने पक्ष्याच्या जखमी पिल्लाला जीवदान दिलं होतं. या पिलाला डोक्याला मोठी जखम झाली होती. पुजा या पिलाला सिरींजने खाऊ भरवतानाचा व्हिडियोही शेअर केला होता. आता हे पिल्लू बरं झालं असून पुजासोबत मस्ती करताना दिसत आहे.
आताही पुजाने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते की, ‘पीक अ बू’ च्या डोक्याला झालेली जखम पुर्णपणे बरी झाली आहे. तिला माझ्या खांद्यावर बसायला आवडतं. हे छोटं बाळ आनंदाचा झरा आहे.’