By  
on  

आणि 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुरकडे आली पहिली चारचाकी

आपल्या प्रत्येकासाठीच स्वकमाईची पहिली वस्तू ही खुप खास असते आणि त्याचा आनंद तर अवर्णनीय ठरतो. स्वत:चं घर स्वत:ची गाडी आपल्या हदयाच्या खुप जवळ असतं. सेलिब्रिटींच्या बाबतीतसुध्दा असंच काही घडताना दिसतं. कष्ट करुन अनेक खाचखळगे सहन करुन ते स्वत:ला सिध्द करतात. मग कुटुंबियांसाठी काहीतरी खास करावं असं त्यांनाही वाटतं.असंच काहीसं झालं आहे, ते चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून विनोदांची आतिषबाजी करणा-या अभिनेता अंकुर वाढवेसोबत. 

अंकुरने नुकतीच फोरव्हिलर गाडी विकत घेतली व तो आनंद त्याने सोशल मिडीयावरुन सर्वांसोबत शेयर केला. ‘आज बाबांचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने घरातली पहिली चारचाकी आलीय’, असं कॅप्शन अंकुरने या फोटोंना दिलं.पहिली गाडी घेतल्याचा आनंद अंकुरच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय, हे या फोटोंवरुन स्पष्ट दिसतंय. यानंतर नेटक-यांनी अबिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

गेल्याच वर्षी अंकुर विवाहबंधनात अडकला. अभिनय व मेहनतीच्या जोरावर अंकुरने शारीरिक व्यंगावर मात केली. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय.
.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive