Exclusive: रणवीर सिंह स्टारर '83' या सिनेमाच्या निर्मितीची धुरा दीपिकाच्या हाती नाही

By  
on  

१९८३ साली भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून सुवर्ण इतिहास रचला. या ऐतिहासिक घटनेवर आधारित कबीर खान दिग्दर्शित '८३' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाबद्दल एक वेगळाच गोंधळ सध्या समोर येत आहे. अनेक आघाडीच्या प्रसारमाध्यमांनी या सिनेमाची निर्मिती अभिनेत्री दीपिका पादुकोण करणार आहे अशी बातमी प्रसिद्ध केली. तसेच या सिनेमात दीपिका काम करत असल्याची सुद्धा चर्चा रंगली.

परंतु पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार या सर्व बातम्या या अफवा असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी या सिनेमात रणवीर आणि दीपिका एकमेकांसोबत काम करणार असल्याची बातमी उचलून धरली होती. परंतु सिनेमाशी संबंधित एका सूत्राकडून या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे आढळले.

दीपिका सध्या मेघना गुलझार दिग्दर्शित 'छपाक' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाची ती सहनिर्मातीसुध्दा आहे. त्यामुळे 'पदमावत'नंतरचा तिचा हा पहिलाच सिनेमा असल्याने तिने आपलं सर्व लक्ष या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टवर केंद्रित केलं आहे. परंतु '८३' सिनेमाबाबतची ही बातमी अफवा असल्याचं समोर आलं आहे. '८३' सिनेमात दीपिकाला कपील देव यांची पत्नी रुमी देव यांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. परंतु अद्याप दीपिकाने याबाबत होकार कळवलेला नाही.

 

 

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या भूमिकेची लांबी '८३' मध्ये २० मिनिटांची असणार आहे. त्यासाठी दीपिकाला या सिनेमासाठी ७ दिवस द्यावे लागणार आहेत. अशावेळेस दीपिका ही भूमिका स्वीकारणार का, हे आता येणार काळच ठरवेल. त्यामुळे पुढची  अपडेट येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार ाहे.

Recommended

Loading...
Share