By  
on  

'मराठी रंगभूमी ही आपली संस्कृती आहे ,आपल्या पिढीनं ती जपायला हवी'

आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. ह्या दिनाचं औचित्य साधून 'दादा एक गुड न्यूज' आहे या नाटकाद्वारे रंगभूमीवर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने पिपींगमून मराठीसह दिलखुलास बातचित केली. 

डेलीसोप करता करता तु नाटकाकडे कशी वळलीस? 

-- मी डेली सोपद्वारेच अभिनयात पदार्पण केलं आणि तिथे मला बरंच शिकतासुध्दा आलं. नाव, प्रसिध्दी आणि एक नायिका म्हणून खरी ओळख मालिकांनीच मला दिली. 'दुर्वा', 'फुलपाखरु' ह्या मालिका म्हणजे माझ्या अभिनय कारिर्दीतले माईलस्टोन. पण म्हणतात ना आपण आपला कम्फर्ट झोन सोडायला हवा.काहीतरी नवा प्रयत्न तुम्ही नक्कीच करायला हवा तरच तुम्ही एक कलाकार म्हणून समृध्द होता.  6-7 वर्ष टेलिव्हिजन केल्यावर मला माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं होतं आणि त्यात 'दादा एक गुड न्यूज'मधील व्यक्तिरेखेसारखी सुवर्ण संधी मिळणं म्हणजे बातच न्यारी.  उमेश दादा, प्रिया ताई आणि अद्वैत दादरकरसारखा दिग्दर्शक अशी संपूर्ण नाटकाची  जबरदस्त टीम मिळाल्यावर 'आणि काय हवं'. लाईव्ह फरफॉर्म करण्याची मजाच काही औरच असते. रंगभूमीवर आपल्याला आपल्या कामाची त्वरित पावती मिळते आणि एका कलाकारासाठी ती खुप महत्त्वाची ठरते.  

'अनन्या' नाटकावर आधारित सिनेमा तु करतेयस, असं कळलं? 

-- हो. मलासुध्दा ही बातमी माध्यमांमुळेच समजली. पण अजुनही काही अधिकृत झालेलं नाही. जेव्हा सर्व बाबी अधिकृत होतील. तेव्हा सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहचेलच. 

नाटक आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना एक कलाकार म्हणून तुला काय फरक जाणवतो?

-- नाटक आणि मालिका ही दोन्ही माध्यमं माझ्यासाठी खुप प्रिय आहेत. मी जसं आधी म्हणाले,तसं टेलिव्हिजनमुळे माझा पाया भक्कम झाला. 'दुर्वा' मालिकेमुळे मला नायिका म्हणून प्रसिध्दी मिळाली. विनय आपटे, अश्विनी एकबोटे  यांसारख्या उत्तम व दिग्गज कलाकारांसोबत काम करायला आणि बरंच काही शिकायला मिळालं. पण दोन्ही माध्यमं अगदी दोन टोकाची आहेत. टेलिव्हिजनवर आपल्याला अनेक टेक घेता येतात, सीन्स दरम्यान सराव करण्याचा वेळ असतो. पण नाटकांचं तस नाही. तुम्हाला लाईव्ह परफॉर्म करायचं असतं आणि सतत अलर्ट राहावं लागतं. तरीही दोन्ही माध्यमांमध्ये काम करणं मी खुप एन्जॉय करतेय

आज रंगभूमी दिनानिमित्त तू तुझ्या प्रेक्षकांना, चाहत्यांना काय सागशील? 

--  सोशल मिडीयावर आजची जनरेशन सतत अॅक्टीव्ह असते. वेबसिरीजसारखे आज मनोरंजनाचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत.  प्रत्येक माध्यमांची एक वेगळी मजा आहे. आपल्या रंगभूमीने ह्या गर्दीत स्वत:चं वेगळेपण आजही टिकवून ठेवलं आहे.मराठी रंगभूमी ही आपली संस्कृती आहे आणि ती जपणं आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच आजच्या पिढीने मराठी रंगभूमी जपायला हवी. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive