या प्रसिध्द अभिनेत्यासह हिंदी सिनेमामध्ये झळकणार प्रार्थना बेहरे

By  
on  

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं. लवकरच प्रार्थना एका हिंदी सिनेमात झळकणार असल्याचं तिनेच एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. तसंच यातला लुकसुध्दा तिने उलगडला होता. 

आता पुन्हा एकदा प्रार्थनाने एका नव्या पोस्टमधून या आगामी  हिंदी सिनेमातला तिचा को-स्टार कोण आहे, याबाबत माहिती दिलीय. हिंदी टेलिव्हिजन विश्वातला प्रसिद्द अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता सोबत प्रार्थना या सिनेमात झळकतेय. इंद्रनीलची चाहती असलेल्या प्रार्थनासाठी ह्या सिनेमात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणं ही फॅन मोंमेंट होती. 

 

 

 

 

 

 

ह्या सिनेमातला प्रार्थनाचा सीन हा रात्री शूट झाला आहे.  प्रार्थनाने हॅशटॅगमध्ये ओटीटी हा शब्द वापरल्याने हा आगामी हिंदी सिनेमा ओटीटीवरच प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Why BLACK AND WHITE ? because colour can be too demanding...

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

 

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारी प्रार्थना आज मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. त्याचप्रमाणे ओटीटीवर प्रदर्शित होणा-या या सिनेमाचीही सर्वांना आतुरता आहे. 

Recommended

Loading...
Share