प्रियांका बर्वेने शेअर केला तिच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण

By  
on  

गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक फॅन्स, कलाकार, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वेनेही दीदींच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका गाणं गाताना दिसते आहे तर तिच्या मागे हृदयनाथ मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे आणि लतादीदी दिसत आहेत.

 

 

या फोटोबाबत प्रियांका म्हणते, ‘ हा क्षण माझ्यासाठी अमुल्य आहे. माझी सगळ्यात आवडती आठवण. लतादीदींच्या समोर त्यांच्याच घरी गाणं गाण्याची संधी मला मिळाली.’ डबलसीट, रमा माधव, मुंबई पुणे मुंबई 2, पानिपत या सिनेमातील गीतांना सुरेल आवाजाने सजवलेली गायिका प्रियांका बर्वे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

Recommended

Loading...
Share